Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे पुण्यात निधन

योग आणि आयुर्वेद या क्षेत्रातील भरीव कार्यासाठी प्रसिद्ध

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज टीम

पुणे, 10 ऑगस्ट : योग आणि आयुर्वेद या क्षेत्रातील भरीव कार्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. बालाजी तांबे यांचं पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी  मंगळवारी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

गेल्या आठवड्यात तांबे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती खालावत गेली. ते उपचाराला प्रतिसाद देईनासे झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

योग आणि आयुर्वेद यांची सांगड घालत सामाजिक परिवर्तनासाठी गेली कित्येक वर्षं ते कार्यरत होते. विविध वृत्तपत्र, मासिकं आणि इतर माध्यमांतून या विषयातलं प्रबोधन करत असत. आतापर्यंत त्यांनी या विषयांवर शेकडो लेख लिहिले. आयुर्वैदाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं मोठं कार्य त्यांनी गेली अनेक वर्षं केलं.

आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीत यांची सांगड घालून आयुष्य अधिक आरोग्यपूर्ण बनवता येऊ शकतं, हा संदेश ते गेली 5 दशकं देत राहिले. शास्त्रोक्त आणि गुणवत्तापूर्ण आयुर्वैदिक औषधांच्या निर्मितीतही त्यांचं योगदान मोलाचं मानलं जातं. आयुर्वैदाचा त्यांनी भारतासह भारताबाहेरही प्रचार आणि प्रसार केला. आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीचा उपयोग करून त्यांनी आयुर्वेदाची महती जगातील अनेक देशांमध्ये पोहोचवण्यात यश मिळवलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.