Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी : वैज्ञानिकांनी घेतले आकाशगंगेची स्पष्ट आणि सुंदर चित्रे

Get real time updates directly on you device, subscribe now.


भविष्यात आकाशगंगेचा अभ्यास करण्यास अधिक स्पष्टता.
वैज्ञानिकांच्या समुहात श्रुती बडोले यांचा समावेश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गोंदिया (१० सप्टेंबर) : खगोलशास्त्रज्ञांनी किमान एक दशकाच्या अथक परिश्रमानंतर आकाशगंगेची सगळ्यात विस्तृत व स्पष्ट इमेज जारी केली आहे.हे चित्र एक रेडिओटेलिस्कोप लो फ्रिक्वेन्सी एरे म्हणजे लोफर च्या माध्यमातून घेण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे.लोफर अंदाजित ७०००० लहान एंटिनांचा समूह असून तो ९ युरोपियन देशात पसरलेला आहे. याचा केंद्र नेदरलॅंड येथील एक्जलू येथे आहे. नुकतेच पुढे आलेले चित्र आश्चर्यजनक असून आकाशगंगा आणि कृष्णविवर यांचे बाबत खूप काही स्पष्ट करतात.युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरचे डाॅ.नील जॅक्सन यांच्यानुसार या उच्च विभेदन (हाय रेझुल्युशन) चित्रांना झूम केल्यानंतर आपण अधिक स्पष्ट पाहू शकतो. जेव्हा सुपर मॅसीव्ह ब्लॉक होल (कृष्णविवर) रेडिओ जेट जारी करतात तेव्हा काय घडते हे यातून स्पष्ट होते. हे यापूर्वी एफएम रेडिओ च्या आसपासच्या फ्रीक्वेंसीवर संभव नव्हते.या संशोधनामुळे भविष्यात आकाशगंगा व कृष्णविवरांच्या अभ्यास करण्यास अधिक स्पष्टता येईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विशेष म्हणजे या वैज्ञानिकांच्या समुहात श्रृती बडोले ही सामील असून,ती माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची मुलगी आहे. तिने ब्रिटनमधील ससेक्स विद्यापीठातून अवकाश संशोधनात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर येथे अवकाश भौतिकीमध्ये पीएचडी करीत आहे.

अवकाश भौतिकीक्षेत्रातील हा एक अभिनव व तांत्रिक प्रवास असून डरहम विद्यापीठाच्या डॉ.लेया मोराबीटो यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन सुरू आहे. यात श्रृती बडोले यांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.