Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सात अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक तर एक पोलीस अंमलदार यांना मिळाले गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २५ जानेवारी :   गडचिरोली पोलीस दलातील ०७ अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व ०१ पोलीस अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार १) पोउपनि भरत चिंतामण नागरे २) सहा.फौ .गोपाल मनिराम उसेंडी ३) पोहवा निलेश्वर देवाजी पदा ४) पोहवा संतोष विजय पोटावी ५) नापोशि दिवाकर केसरी नरोटे ६) नापोशि महेंद्र गणू कुलेटी ७) पोशि संजय गणपती बाकमवार तसेच सहा.फौ. बस्तर लक्ष्मण मडावी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक मिळाले आहेत.

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी असतांना उल्लेखनिय व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक बहाल करण्यात आलेले आहे. सदर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उल्लेखनिय व वैशिष्टयपुर्ण कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे वतीने त्यांचे  पोलीस अधीक्षक  अंकित गोयल यांनी कौतुक केले असुन त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

भीषण अपघात: झायलो पुलावरुन कोसळून सात जणांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये तिरोडातील आमदारपुत्राचाही समावेश

६ वर्षाच्या चिमुकलीला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.