Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ब्रेकिंग: भारताच्या एअर स्टाइक मध्ये अनेक दहशतवादयांचा खात्मा..पीओके मधील लाँच पॅड केले उध्वस्त.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

वृत्तसंस्था:19 नोव्हेंबर: भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात सर्वात मोठी कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक बंकर्स उद्ध्वस्त केले आहे. हे भारतासाठी मोठं यश मानलं जात आहे. 2 दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांना पडकलं होतं. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्या आधारे सैन्याने ही धडाकेबाज कारवाई केली

याआधी देखील भारतीय सैन्याने केलेल्या धडक कारवाईत 20 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. त्यावेळी देखील दहशतवाद्यांच्या छावण्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता देखील भारतीय सैन्याने ही मोठी कारवाई केली. थंडीच्या दिवसात पाकिस्तानमधून अनेक दहशतवादी भारतात घुसखोरी करतात. त्यामुळेच भारताने या घुसखोरीला सडेतोड उत्तर देत घुसखोरी आधीच दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे या विषयावर बोलताना म्हणाले, “भारताने अचूक कारवाई करत दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड उद्ध्वस्त केले आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताचे लष्करप्रमुख नरावणे यांनी देखील एलओसीच्या परिसरात पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉन्चपॅड आहेत. याशिवाय तेथील कोअर कमांडर यांनी देखील केरन सेक्टरमध्ये तब्बल 20 दहशतवादी लॉन्चपॅड असल्याचं म्हटलं होतं.”

“हिवाळ्यात शेकडो दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही महत्त्वाची माहिती भारताकडे होती. यावर भारतीय सैन्याने अचूक कारवाई केलीय. आता तरी पाकिस्तानने आपल्या देशातून होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबवल्या पाहिजेत,” असंही सतीश ढगे यांनी नमूद केलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.