Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाने घेतला इसमाचा बळी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. १२ जून :  ब्रह्मपुरी तालुक्यापासून 36 किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा हळदा येथे राजू अर्जुन कांबळे वय -४२ वर्ष या इसमावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले आहे. सदर घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे.

मृतक इसम हा काही कामानिमित्त पत्नी व मुलासह झुडपी जंगलातील पायवाटेने जात असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघानेअचानक त्याच्यावर झडप घेतली आणि त्याला जागीच ठार केले. पत्नी व मुलाच्या ओरडण्यामुळे वाघ तिथून पळून गेला. मृतक राजू याला दोन मुले असून बराच मोठा आप्तपरिवार आहे.
घटनास्थळी ब्रह्मपुरी वनविभाग व पोलीस विभाग दाखल झाले असून लोकांच्या हालचाली वर नियंत्रण ठेवून आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गांगलवाडी ,बरडकीन्ही,चिचगाव, डोरली, वान्द्रा ,कोसंबी ,आवळगाव , हळदा, मुडझा आणि परिसरात रोज समूहाने वाघाचे दर्शन घडत असते. मागील महिन्यातच आवळगाव येथिल तुळशीराम कांबळे या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केले होते.

आता शेतीचा हंगाम सुरु झाल्यामुळे लोकांना शेती करण्यासाठी आपल्या शेतात जावे लागते. त्यामुळे परिसरातील अशा नरभक्षी वाघांचा, आणि इतर वाघांचा बंदोबस्त करून परिसरातील जनतेला शेतकऱ्यांना भयमुक्त जीवन जगण्यास , शेतीची कामे करण्यास त्वरित वनविभागाने पाऊले उचलावि अशी हळदा व परिसरातील जनतेची मागणी आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

गुप्तधन शोधण्याच्या मोहापायी पत्नीचा देणार होता बळी; पती व सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल

हळदी समारंभात एका आदिवासी महिलेला चेटकीण ठरवत तिची अवहेलना

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.