Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कार्तिक यात्रे दरम्यान पंढरपुर मध्ये संचार बंदी तर येणाऱ्या जाणाऱ्या बसेस राहणार बंद.. जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

सोलापूर, दि. 21 नोव्हेंबर: 26 नोव्हेंबर राजी होणाऱ्या कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूर मध्ये भाविकांची गर्दी होऊ नये. यासाठी पंढरपुर मध्ये संचारबंदी कायदा लागू करण्यात येणार आहे.तसेच पंढरपुर मध्ये येणारी व जाणाऱ्या सर्व बसेस या दरम्यान बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दिल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत कार्तिकी एकादशीचा सोहळा भरल्यास राज्यभरातील वारकरी पंढरपुरात एकत्र येतील. यामुळे कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होईल. त्यामुळे पंढरपूर मध्ये वारकर्‍यांची गर्दी होऊ नये. यासाठी कार्तिकी यात्रा भरून न देण्याचे शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार भाविकांना पंढरपुरात न येऊ देण्यासाठी १८०० पोलिसांचा बंदोबस्त जिल्हा व पंढरपूर शहर परिसरात लावण्यात आला आहे. तसेच पंढरपूर कडे येणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्याचबरोबर पंढरपूर शहर व शहरालगतच्या १० किलोमीटर परिसरामध्ये व १० गावांमध्ये संचार बंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. मात्र शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.