Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई ठाणे पालघरमध्ये पावसाचे थैमान.

राज्यात अतिवृष्टीचा इशारा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई/ पालघर ६ जुलै मनोज सातवी :- मुंबईसह संपुर्ण कोकण किनारपट्टीवर तसेच मध्य महाराष्ट्रावर मुसळधार ते अतिवृष्टीचा हवामान खात्याने दिलेला इशारा खरा ठरत आहे. मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यात सोमवार पासून धुव्वाधार बरसात सुरू केली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 9 जुलैपर्यंत मुंबईसह संपुर्ण कोकण किनारपट्टीवर तसेच मध्य महाराष्ट्रावर मुसळधार ते अतिवृष्टीचा  होणार असल्याने नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे.

मुंबईत धोधो पाऊस
मुंबईत गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मुंबईतील पावसाची नोंद
मुंबई शहर- 107 मी.मी.
पूर्व उपनगर – 172 मी.मी.
पश्चिम उपनगर – 152 मी.मी.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान – मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाण्यात जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले
पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या चोवीस तासात वसई तालुक्यात 217मी मी इतक्या पावसाची नोंद झाली असून, पालघर तालुक्यात 139.43मी मी पावसाची नोंद झाली आहे.
त्यामुळें वसई, नालासोपारा, विरार मधील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. पालघर, बोईसर या ठिकाणी देखील पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान मंगळवारी पहाटेपासून पुन्हा पावसाने थैमान घालायला सुरुवात केली असून त्याचा जोर वाढतच आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे. तसेच, मदतीची आवश्यक असल्यास आपल्या ग्रामपंचायत, तलाठी, ग्रामसेवक, तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण व जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षाशी तसेच तहसील कार्यालय यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हे देखील वाचा :-https://loksparsh.com/top-news/lpg-gas-cylinder-price-hike-domestic-lpg-gas-price-hike/27301/

Comments are closed.