Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नगरपरिषद च्या वाढीव कराविरोधात झालेल्या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकहीत संघर्ष समिती, आरमोरी देणार निवेदनातून आंदोलनाचा इशारा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आरमोरी :- आज दि.९ जुलै २०२२ ला नगरपरिषद आरमोरी च्या कर वाढ विरोधात लोकहीत संघर्ष समिती,आरमोरी तर्फे आयोजित केलेल्या सभेला आरमोरी शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या सभेला बहुसंख्येने आरमोरी शहरातील नागरी व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

या सभेत आरमोरी नगर परिषदेने आरमोरीकरांवर लावलेल्या विविध करा विरुद्ध नागरिकांचे मत जाणून घेण्यात आले ज्यामध्ये नागरिकांनी मागील वर्षीच्या करात व यावर्षीच्या करामध्ये असलेल्या तफावतीबाबत आपले मत सभेत व्यक्त केले सभेमध्ये सर्वानुमते नगरपरिषद आरमोरी ने तात्काळ वाढीव कराचा निर्णय मागे घ्यावा यासाठी दि.११ जुलै २०२२ सोमवार ला नगरपरिषदेला निवेदन देण्याचे ठरले याप्रसंगी लोकहित संघर्ष समिती आरमोरी चे पदाधिकारी देवानंद दुमाने, रंजीत बनकर, प्रफुल खापरे, अमोल मारकवार ,निखिल धार्मिक ,राहुल जुआरे, महेंद्र शेंडे,राजू अंबानी, मनोज वनमाळी, शालिक पत्रे, सुनील नंदनवार ,संदीप ठाकूर ,अमीन लालानी,रिंकु झरकर,महादेव कोपुलवार ,अशोक वाकडे,प्रदीप हजारे, सुरज पडोळे,मोरेश्वर टेंभुर्णे ,मनोज गेडाम, संजय वाकडे ,चंदू वडपलीवार, विजय सुपारे ,मिलिंद खोब्रागडे, सिद्धार्थ साखरे,सारंग जांभुळे, अंकुश गाढवे ,प्रफुल ठवकर, विभाताई बोबाटे ,ज्योतीताई सोनकुसरे ,कल्पना तिजारे,ज्योती बघमारे, उमा कोडापे, जयश्री कापकर व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.