Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई – गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार तलावात बुडाली.

सुदैवाने जिवीतहानी टळली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रायगड 11 जुलै :-  रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर खरोशी फाटा जवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने  तलावात कार बुडाल्याची घटना आज दिनांक १० जून रोजी घडली. कल्याण वरुन पेण ज्या दिशेने येत असलेली एम. एच. ०५- डी एस ५५०१ ही कार चालक भरधाव वेगाने चालवताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदरची गाडी तलावात बुडाली.
ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तात्काळ तलावात उडी मारून कार चालकाचे प्राण वाचविले. चालकाचे प्राण वाचविणार्‍या तरुणांचे ग्रामस्थ व प्रशासना कडून कौतुक होत आहे. घटनेची माहिती मिळताच दादर सगारी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गोविंदराव पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कमलाकर भऊड आदी पोलिसांनी घटनास्थळी त्वरित हजर राहून क्रेन टोचनच्या सहाय्याने तलावातुन काढण्यात आली.

हे देखील वाचा :- मोठी बातमी ! शिंदे सरकारला मोठा दिलासा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मोठी बातमी ! शिंदे सरकारला मोठा दिलासा.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ताडोबातील प्रसिद्ध “माधुरी” व “तारू” वाघाच्या जोडीने दिले दर्शन…..

Comments are closed.