Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडी कडून अटक…

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई प्रतिनिधी 19 जुलै :-  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) याना ईडीने बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणात आधी त्यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआयने ( National Stock Exchange phone tapping ) त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. आज पांडे यांना ईडीकडून चौकशीसाठी पुन्हा बोलावले असता चौकशीनंतर त्यांना अटक केली आहे.

संजय पांडे ज्यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक होते तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच NSE सर्व्हर कॉप्रमाईज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती, ही कंपनी संजय पांडे यांची होती. या प्रकरणात बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.