Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासी मुलांच्या रायगड येथील नामांकित शाळेतील होणाऱ्या गैरसोयीबद्दल जव्हार प्रकल्प अधिकारी यांना निवेदन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

जव्हार 4 ऑगस्ट :-  आज दिनांक 04/08/2022 रोजी जव्हार प्रकल्प कार्यालय येथून इंग्लिश मिडीयम स्कूल नम्रता आचार्य इंग्लिश मिडीयम स्कूल शेलू  ता. कर्जत जिल्हा रायगड येथे शिक्षणासाठी पाठवलेल्या मुलाचे पालक यांनी बहुजन विकास आघाडी कार्यालय जव्हार येथे भेट घेऊन तिथे होणारी मुलाची गैरसोय याची माहिती दिली. मला ही माहिती कळताच या सर्व पालकांना घेऊन थेट प्रकल्प कार्यालय गाठून प्रकल्प अधिकारी मॅडम यांची भेट घेतली व माहिती दिली. आदिवासी विकास विभाग आमच्या आदिवासी मुलांना इंग्लिश चांगल्या प्रकारे यावे, आदिवासी मुलेही या स्पर्धेच्या युगात मागे नको पडायला म्हणून शासन करोडो रुपये खर्च करते पण आजही त्याच्या चांगल्या प्रकारे फायदा आदिवासी मुलांना होत नाही हे दुर्दैव आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आजही या शाळेत शिक्षण दिवसातून 1,2 दोनच तास दिले जाते,हे मुले आजारी पडल्यावर लक्ष दिले जात नाही, एक ड्रेस 3 दिवसात घालायला लावतात, पालक सभा अजून पर्यंत झाली नाही असे पालकांचे म्हणणे आहे या शाळे पेक्षा जिल्हा परिषद कितीतरी पटीने चांगली आहे. आम्ही आमची मुले हुशार व्हावे,आमच्या मुलांनाही इंग्लिश यावे यासाठी तिकडे पाठवले परंतु आमचा भ्रम निराश झाला.असे पालकांनी बोलताना सांगितले. याची सर्व माहिती मी आयुषी सिंह मॅडम प्रकल्प अधिकारी यांना सांगितले व यावर चर्चा करून निवेदन दिले.

मुलाची होणारी गैर सोय या बाबत बोलताना प्रकल्प अधिकारी मॅडम यांनी सांगितले की, आमची कमिटी येत्या 4, 5 दिवसात जाऊन सगळी माहिती घेईल, मी लगेच च त्या शाळेच्या प्रिन्सिपल यांना कॉल करून सगळी माहिती देते आणि सुधारणा करायला सांगते आणि येत्या आठवड्यात पालक सभा ही लावली जाईल. शिक्षणाची गुणवत्ता पण चेक केली जाईल व लवकरच जव्हार प्रकल्प कार्यालय अंतर्गत जितक्या इंग्लिश मिडीयम स्कूल ला मुले पाठवली आहेत त्यांची संयुक्त सभा घेतली जाईल असे बोलताना प्रकल्प अधिकारी मॅडम यांनी सांगितले. यावेळी बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा, कोगदा माजी सरपंच तथा युवा आदिवासी संघ जव्हार अध्यक्ष अशोक राऊत, माजी सरपंच राजेश वातास,अनंता झुगरे म.ठाकूर समाज उप अध्यक्ष मोखाडा , लक्ष्मण पारधी वावर गण व पालक वर्ग उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

https://fb.watch/eGhbOBt6qK/

 

Comments are closed.