Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत भव्य सायकल रॅलीचे आयोजन.

सायकल रॅली 13-08-2022 रोजी सकाळी इंदिरा गांधी चौक येथून सुरू होऊन जिल्हा परिषदेच्या प्रांगणात समारोप

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 10 ऑगस्ट  :- 

भारताच्या स्वातंत्र्याला यंदा 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. आपण सर्व या दिवसाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. हे वर्ष जितके ऐतिहासिक, गौरवपूर्ण आहे तसेच देशासाठी जितके महत्वपूर्ण आहे, देशदेखील तितक्याच भव्यतेने आणि उत्साहाने हे वर्ष साजरे करणार आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून जिल्हा परिषद, गडचिरोली च्या वतीने आझादीका अमृत महोत्सव निमित्ताने दिनांक 9 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 13/8/2022 ला भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीमध्ये नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सायकल रॅली ही दिनांक १३.०८.२०२२ रोजी सकाळी इंदिरा गांधी चौक येथून सुरू होऊन जिल्हा परिषदेच्या प्रांगणात समारोप होणार आहेत. सदर रॅली मध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी हे सहभागी होणार आहेत. सोबतच स्थानिक नागरिकांनीही मोठया संख्येने सहभागी व्हावे आणि आझादीका अमृत महोत्सवात साजरा करावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केल आहे. हा अमृत महोत्सव साजरा करण्याची जबाबदारी देशाने आपल्या सगळ्यांवर सोपविली आहे हे आपले भाग्य आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सर्वतोपरी प्रयत्न करून मोठया संख्येने आझादीका अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शेवटी मृत्यूने गाठलच! विजेचा खांब कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.