Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भामरागड उपवनसरंक्षकाच्या निष्काळजीमुळे वनकर्मचाऱ्यांची दिवाळी झाली अंधारात. दिवाळी नंतर मिळाले फेस्टीवल अलाउन्स.

  • वराती मागून घोडे दामटण्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रवृत्तीमुळे वनकर्मचाऱ्यांत असंतोष.
  • उपवनसरंक्षक यांच्या मनमानी कारभाराने आस्थापना कक्ष लेखापालास केले निलंबित.
  • वनकर्मचाऱ्यांत दहशतीचे वातावरण.

प्रतिनिधी – मिलिंद खोंड, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २४ नोव्हेंबर: भामरागड वनविभागाच्या वनकर्मचाऱ्यांची दिवाळीमध्ये फेस्टीवल अलाउन्स देण्यात येत. त्यासाठी निधीही उपलब्ध असतांना अधिकाऱ्यांच्या लेटलतिफ धोरणाने  वनकर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. वनकर्मचाऱ्यांना शासनाकडून देण्यात येणारा 12,500 रू. दिवाळी अग्रिम म्हणून देण्यात येतो. मात्र वेळेत फेस्टीवल अलाउन्स न मिळाल्याने वनकर्मचाऱ्यांत नाराजी दिसून आली. भामरागड वन विभाग हा अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात मोडतो. रात्रंदिवस वनकर्मचारी वनाची रक्षण करण्यासाठी परिवारापासून दूर राहतात. देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आधीच वेतन वेळेवर होत नसल्याने कुटुंबाचा आधीच आर्थिक बजेट कोलमडला असतांनाही सणासुदीच्या दिवसात वेळेवर वेतन आणि दिवाळीत मिळणारा  फेस्टीवल अलाउन्स मिळेल आणि दिवाळी कुटुंबासह साजरा करता येईल अशी अपेक्षा असतांना दिवाळी नंतर फेस्टिवल अलाउन्स मिळाल्याने वन अधिकाऱ्यांचे लेटलतिफ धोरण समोर आले आहे.   

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वरिष्ट वनाधिकारी व कार्यालयीन कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याने वनकर्मचाऱ्यांचे शासकीय कामातही अडचण निर्माण झाली आहे. उपवनसरंक्षक हे अधिनस्त असलेल्या वनकर्मचाऱ्यांचे समस्या समजून न घेता त्यांच्यावरच अधिकाराचा आव निर्माण करून निलंबित करण्याचे भाषा करत असल्याने कर्मचारी प्रचंड दहशतीत आहे. आज याचा प्रत्यय भामरागड वनविभागातील एका लेखापालला निलंबित केल्याने आला आहे. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांत असंतोष निर्माण होऊन कार्यालयीन कामकाजात मोठा अडथळा निर्माण होत असल्याने वनकर्मचाऱ्यां मार्फत बोलले जात असून वनसंघटनेमार्फत आंदोलनाचा पवित्रा स्वीकारून स्वता:च्या न्याय हक्कासाठी लढा उभारणार असल्याचे वनकर्मचाऱ्यांत चर्चा आहे.          

ऑगस्ट महिन्यात बदली झालेल्या 6 वनरक्षकांना अद्याप कार्यमुक्त आदेश नाही:

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भामरागड वनविभागातुन इतर विभागात 6 वनरक्षकांची बदली झाली होती. मात्र अद्याप पर्यत त्यांना या विभागातून कार्यमुक्त आदेश मिळाले नसल्यामुळे बदली झालेले वनरक्षक त्याच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्याच्या बदली होऊनही नशिबी पुन्हा प्रतीक्षाच करणे वाटयाला आलेलं आहे. भामरागड वनविभागात अत्यंत दुर्गम ठिकाणी काम करावे लागते त्यामुळे बऱ्याच अडचणीना सामना करावा लागते. त्यामुळे बदली होऊन 4 महिने लोटल्यानंतरही कार्यमुक्त आदेश न मिळाल्याने त्या 6 वनरक्षकांना व त्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

भामरागड वनविभागाचा कार्यभार घेऊन एक महिन्याच्या कालावधी झालेला आहे. बदली झालेल्या वनरक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी माझ्या आधी जे अधिकारी होते त्यांनी केले नाही आणि  दुसऱ्या विभागातून बदली झालेले वनरक्षक या वनविभागात रुजू झाले नाहीत त्यामुळे बदली झालेल्या वनकर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले नाही. यासोबतच बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना बदली स्थळी पाठविल्यास रिक्त पदे राहतात. आधीच या विभागात रिक्त पदे असल्याने कर्मचाऱ्यांना अद्याप कार्यमुक्त केलेले नसून शासकीय कामात कुठल्याच कर्मचाऱ्यांना माझ्यामुळे त्रास होईल असे झाले नाही. मी शासनाच्या ध्येय धोरणानुसारच या ठिकाणी काम करीत असून माझ्याकडे कामचुकार कर्मचाऱ्यांना माफ करता येणार नाही.

रजतकुमार – उपवनसरंक्षक भामरागड वनविभाग  

Comments are closed.