Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांचे निधन.

महिनाभरापूर्वी अहमद पटेल यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क २५ नोव्हेंबर :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज (२५ नोव्हेंबर) पहाटे ३.३० वाजता निधन झालं आहे. त्यांचे पूत्र फैजल पटेल यांनी त्यांच्या ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. महिनाभरापूर्वी अहमद पटेल यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पटेल त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. जास्त त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. अहमद पटेल यांचं निधन वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अहमद पटेल हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय होते. दिल्लीतल्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फैजल पटेल यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आपणास कळवताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज 25 मे रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला”. फैजल पटेल यांनी पुढे लिहिले आहे की, “मी आमच्या सर्व शुभचिंतकांना विनंती करतो की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यदर्शनसाठी येताना गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी”.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे. सोनिया गांधींना राजकारणात स्थिरावण्यासाठी पटेल यांनी मोठी मदत केली. गांधी कुटुंबासह काँग्रेसविषयी खडान्-खडा माहिती अहमद पटेल यांना होती. तसंच जेव्हा पक्षहिताचा प्रश्न यायचा, तेव्हा सोनिया गांधी अहमद पटेल यांचा सल्ला अंतिम मानायच्या. एकूणच गांधी कुटुंब आणि काँग्रेसमध्ये अहमद पटेल यांना मानाचं स्थान होतं.

त्यांच्या जाण्याने काँग्रेसची मोठी हानी झालीये. देशभरात काँग्रेसची पिछेहाट होताना त्यांच्या अकाली जाण्याने काँग्रेस नेत्यांना तसंच कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलाय. ट्विटर, फेसबुकद्वारे नेते, कार्यकर्ते पटेल यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त समजताच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “हा एक दु: खद दिवस आहे. अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ होते. पक्षाच्या सर्वात कठीण काळात ते पक्षासोबत उभे होते, त्यांनी काँग्रेस पक्षातच अखेरचा श्वास घेतला. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल. फैजल, मुमताज आणि पटेल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत”.

Comments are closed.