Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तलाठ्यांच्या प्रमाणपत्राच्या आधारावर धानाची खरेदी घ्यावी – अजय कंकडालवार जि. प.अध्यक्ष

जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांना निवेदन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:  

गडचिरोली, दि. २५ नोव्हेंबर: गडचिरोली हा नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हा असून या ठिकाणी बरेचसे शेतकरी हे वनधारक आहेत. त्यांना आजतागायत शासनाकडून पट्टे उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. अशा शेतकऱ्यांकडून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी करण्यात येत नाही. यापूर्वी तलाठी यांच्या प्रमाणपत्राच्या आधारावर धान खरेदी करण्यात येत होती. जे वनधारक शेतकरी आहेत व त्यांना आजतागायत पट्टे वितरीत करण्यात आले नाही अशा वनधारक शेतकऱ्यांची धान खरेदी पूर्वीप्रमाणे तलाठी यांच्या प्रमाणपत्राच्या आधारे करण्यात यावी अशी मागणी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यात  खरीपाची काढणी अंतीम टप्प्यात असून खरीपातील उत्पादनाची विक्री करावयाची असल्याने शेतकऱ्यांना सातबारयाची गरज आहे. मात्र सातबारा मिळाला नसल्याने किमान तलाठ्याचे प्रमाणपत्रावर खरेदी करण्यात यावी. जेणेकरून शेतकऱ्यांना सुविधा होईल.

शेतमालाची शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करावयाची असल्यास सातबाऱ्याची मागणी केले जाते. वनहक्काने पट्टा मिळाला असला तरी आम्हाला अजूनपर्यंत सातबारा मिळाला नाही, अशी अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे. मागील वर्षी काही शेतकऱ्यांना तलाठ्याकडून धान उत्पादन घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाले. त्याच्यावर धानाची खरेदी विक्री करता आली तर काही शेतकऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले नव्हते. त्यांना धानाची विक्री करण्यास बरीच अडचण निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सातबारा द्या अथवा किमान तलाठ्याकडून मिळालेल्या प्रमाणपत्राच्या आधारावर धानाची खरेदी करता यावी. अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.