Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात कर्मचारी व कामगारांचा अमरावतीत विशाल मोर्चा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:  

अमरावती, दि. २६ नोव्हेंबर: दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने सक्तीचे सेवानिवृत्त जाहीर केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या भर्तीवरही बंदी आणली आहे, तसेच शिक्षीत युवकांच्या सर्व रोजगाराच्या संधी केंद्रातील भाजप सरकारने हिरावून घेतल्या. त्याचबरोबर शेती व्यवस्थेचेही खाजगीकरण करण्याचे काम नव्या कृषी कायद्यातून केंद्र सरकारने केला आहे. सोबतच 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी शेकडो कर्मचारी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले होते .केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून संविधनाचे उल्लंघन होत असल्याचा अरोप करत आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शासकीय कर्मचारी व कामगारांनी मोर्चा काढत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला तर मोर्चात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी या मोर्चात हजारो कर्मचारी,शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.