Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यातील राजकारणात वादंग उठवणार विमान प्रकल्प आहे तरी काय?

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली,  28, ऑक्टोबर :-  राज्यात सुरू होणारे विविध प्रकल्प गुजरातला पळवण्याचा आरोप विरोधी पार्टी कडून होत असतांनाच नागपूरमध्ये होणारा एअरबस प्रकल्पसुध्दा परराज्यात नेल्याचा आरोप राष्ट्रवादीसह आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात वादंग पेटले आहे. यापूर्वी वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजारात नेल्याने आधीच राजकारण तापले आहे.

एअरबस प्रकल्प नेमका काय आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गुजरात राज्यातील वडोदरा येथे टाटा आणि एअरबस या दोघांच्या संयुक्त उपक्रमातून C-295 हे मोठे वाहतुक करणारे विमान तयार होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस विमान तयार करणारे युनिट सुरू होणार आहे. या विमानचा भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात समावेश करण्यात येणार आहे अशी माहिती संरक्षण सचिव अजय कुमार यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर रोजी या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या मते या कारखान्यात केवळ C-295 हे वाहतुक विमानंच तयार होणार नाही तर, वायुसेनेच्या गरजेनुसार आधुनित विमान तयार करण्यात येणार आहे.?

टाटा एडवान्स आणि एअरबस यांच्या संयुक्त उपक्रमातून  C-295 हे वाहतुक विमान तयार करण्यात येत आहे. 30 ऑक्टोबर रोजी वडोदरा येथे पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची कोनशिला ठेवण्यात येईल. युरोपच्या बाहेर पहिल्यांदाच हे विमान तयार होत आहे. त्यावरून हा प्रकल्प भारतासाठी किती महत्वाचा आहे हे अधोरेखिल होते. सप्टेेंबर 2021 मध्ये केंद्र सरकार ने C-295 साठी करार केला होता. हा करार 21 हजार कोटी रूपयांचा आहे. सरकार जुन्या एवरो 748 या विमानांच्या जागी C-295 हे विमान आणणार आहे. त्यासाठी पहिल्यांदाच खासगी कंपन्या संरक्षण विभागासाठी विमान तयार करणार आहेत. हा भारतसाठी मोठा महत्वकांक्षी प्रकल्प असेल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

करारानुसार एअरबस सुरवातीला 16 विमान तयार स्थितीत स्पेनहून पाठवणार आहे. त्यानंतर उर्वरीत 40 विमानांची निर्मिती टाटा एडवान्स सिस्टम आणि एअरबस मिळून करणार आहेत.  C-295 हे विमान वायुसेनेसाठी अत्यंत महत्वाचे मानण्यात येते. हे विमान एकावेळी 71 सैनिक आणि मोठे मोठे शस्त्र घेउन जाण्यास सक्षम आहे. या विमानामुळे देशातील दुर्गम भागात रसद पाठविणे अत्यंत सोपे होणार आहे. मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी हे विमान अत्यंत महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे. एअरबास कंपनीच्या दाव्यानुसार, या विमानासाठी कंपनीकडे आतापर्यंत 285 ऑर्डर आल्या आहे. त्यातील 203 विमान कंपनीने तयार केली आहेत.

हे देखील वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.