Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

फेर चौकशी होउन जाउ द्या मग बघू कोण कुणाच्या उरावर बसणार – गिरीश महाजन

खडसे यांच्या फेर चौकशीचे आदेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

जळगाव, 29, ऑक्टोबर :-  न्यायालय ने एसीबीला फेर चौकशीचे करण्याचे आदेश दिले आहेत. एकदा ही चौकशी होउन जाउ द्या. मग बघु कोण कुणाच्या उरावर बसरणा आहे अशी टीका धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे. एकनाथ खडसे यांची एसीबी चौकशी आदेश थांबविण्याचे आदेश यापूर्वी न्यायालयाने दिले होते. परंतु पुणे न्यायालयाने खडसे यांच्या चौकशीचे फेर आदेश दिल्याने पुन्हा एकदा खडसे विरुद्ध महाजन हा कलगीतुरा रंगला आहे.

जळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात महाविकास आघाडीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांना जेलमध्ये टाकून निवडणुका पार पाडायच्या आहे. मात्र, मी त्यांच्या उरावर बसेल, असे वाक्य वापरून भारतीय जनता पार्टीवर टीका केली होती. या टीकेला धुळ्यात मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई आणि परिवारांच्या सदस्यांसह खडसे यांच्यावर असलेले आरोप कोर्टाने आदेश केल्याने चौकशी थांबवली आहे. त्यामुळेच त्यांच्यावरील कारवाई थांबली आहे. पण आता पुणे कोर्टाने पुन्हा फेर चौकशीचे आदेश दिले आहे. एकदा ही चौकशी होऊन जाऊ द्या, त्यानंतर कोण कोणाच्या उरावर बसणार आहे ते ठरवा. असा टोला मंत्री महाजन यांनी मारला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अशा पद्धतीने भाषा वापरणे, संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे मी त्यांना सबुरीचा सल्ला देतो आहे. असेही त्यांनी सांगितले पेन ड्राईव्ह च्या माध्यमातून त्यांचे सर्व कारनामे जनतेच्या समोर आले आहेत असा टोला त्यांनी लगावला.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.