Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टीम इंडियाने बांग्लादेशवर 5 धावांनी विजय

सेमी फायनल का मार्ग सुकर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

एडिलेड, 02 नोव्हेंबर :- शेवटच्या चेंडूपर्यत श्वास रोखून धरण्यास भाग पाडलेल्या टीम इंडिया ने बांग्लादेशवर 5 धावांनी विजय मिळवला आहे. सेमीफायनल मध्ये प्रवेशासाठी टीम इंडियाला आजच्या मैच मध्ये विजय आवश्यक होता. या विजयामुळे आता टीम इंडियाचा पुढचा मार्ग सुकर झाला आहे. आजच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे सामना 20 ऐवजी 16 षटकांचा करण्यात आला होता.

बांग्लादेशच्या कॅप्टन शाकीब अल हसनने टाॅस जिंकून टीम इंडियाला पहिले बॅटिंग दिली. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 184 धावा केल्रूा. बांग्लादेशला विजयासाठी 185 धावांची गरज होती. मात्र, सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे सामना 20 ऐवजी 16 षटकांचा करण्यात आला. बांग्लादेशला विजयासाठी 16 षटकात 151 धावांच टार्गेट देण्यात आले. मात्र, बांग्लादेश ने 16 षटकात 145 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने 2 तर अर्शदीप सिंग ने 2 विकेत घेतल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.