१२ व १३ नोव्हेंबर रोजी पालघर ग्रंथोत्सवाचे सोनोपंत दांडेकर महाविद्यालय येथे आयोजन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघर, 10 नोव्हेंबर :- सध्या वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. सारी दुनिया मुठी मे म्हणत मोबाईल लक्झरी वस्तू न राहता आज गरजेची वस्तू झाली आहे. लोकांना सारे काही एका क्लिक वर मिळते. हे जरी खरे असले तरी वाचनाचा आनंद काही औरच असतो.
आज ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचनसंस्कृतीची वाढ व्हावी व ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत तसेच प्रकाशक व ग्रंथ विक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, ग्रंथांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने पालघर ग्रंथोत्सव – २०२२ हा उपक्रम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, ठाणे, (नेरुळ) या कार्यालयाच्या वतीने दिनांक १२ नोव्हेंबर व १३ नोव्हेंबर रोजी सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथे आयोजित करण्यात आला आहे. असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, ठाणे (नेरुळ) यांनी कळविले आहे.
हे देखील वाचा :-
Comments are closed.