Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिलांनी कायदे विषयक माहिती जाणून घ्यावी – न्या. नागेश न्हावकर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेड, 14 नोव्हेंबर :- भरोसा सेल नांदेड विभागाकडून पिडीत महिलांना पुरविण्यात येणारी सेवा, विविध हेल्पलाइ्रन नं, विविध महिला विषयक कायद्यांबाबत महिलांनी माहिती जाणून घ्यावी असे आह्वान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अध्यक्ष नागेश व्ही. न्हावकर यांनी केले. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शासकीय महामेळावा, जनजागृती आणि प्रदर्शन स्टाॅलचे आयोजन नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्हा प्रशासन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण करण्यासाठी शासकीय सेवा व विविध योजनांचा महामेळावा 13 नोव्हेंबर रोजी पिपल्स काॅलेज मैदान स्नेहनगर नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. सदर महामेळाव्यामध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलाचे वतिने विविध जनजागृती व प्रदर्शन स्टॉल लावण्यात आले होते.

सायबर पोलीस स्टेशन, नांदेड यांचे वतिने सामान्य नागरिकांना सोशल मिडीया सुरक्षितता, ऑनलाईन पेमेंट सुरक्षितता, मोबाईल हरवल्यास काय करावे, तसेच सिटीजन पोर्टल, नांदेड फेसबुक, व्टिटर पेज याविषयी माहिती सांगुन जनजागृती केली व सायबर सुरक्षितते बाबत भेट देणारे नागरिकांना माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भरोसा सेल नांदेड विभागाकडुन पिडीत महिलांना पुरवण्यात येणारे सेवा, विविध हेल्पलाईन नं., विविध महिला विषयक कायदयांबाबत सदर महामेळाव्यात जनजागृती करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतुक विभाग यांचे वतीने नांदेड जिल्हयातील अपहरणाचे
गुन्हयातील लहान बालकांच्या फोटोंचे वर्णनासहीत प्रदर्शन ठेवण्यात आले व सदर हरवलेले बालके मिळुन आल्यास अनैतिक मानवी वाहतुक विभागास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. सदर महामेळयामध्ये नांदेड वाहतुक शाखेतर्फे वाहतुक चिन्हांचा वापर, वाहतुक नियमांचे पालन करावे, वाहतुकीचे नियम मोडल्यास लागणारे दंड याविषयक जनजागृती करण्यात आली. डायल ११२”
क्रमांकाविषयी जनजागृती करण्यात आली. महामेळाव्यास विविध मान्यवरांनी भेट दिली.

सदर महामेळाव्यात मा. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. अश्विनी जगताप पोलीस उप अधीक्षक, गृह व विविध शाखा प्रमुख यांनी जनजागृती / प्रदर्शन स्टॉल चे आयोजन यशस्वीरित्या केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.