Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा द्या – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 14 नोव्हेंबर :-   झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा देण्याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. अंधेरी पूर्व येथील के ईस्ट वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार पराग आळवणी तसेच सर्व विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री  लोढा म्हणाले की, या विभागातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीच्या भिंतींच्या पुनर्बांधणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने निधी उपलब्ध करून द्यावा. रस्ता बांधकामावेळी ज्यांचे घर तोडले जात असेल, त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात नियमाप्रमाणे कार्यवाही करावी. शासनामार्फत अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जमिनींच्या तक्रारीवर तातडीने निर्णय घ्यावा. शासकीय सामग्रीची चोरी होत असलेल्या भागात सीसीटीव्ही बसवावेत व नुकसानग्रस्त भागाची दुरूस्ती करावी, असे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी बैठकीत दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नागरिकांच्या विविध 346 विषयासंदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’  हा उपक्रमामध्ये नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी https://mumbaisuburban.gov.in तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकासंदर्भात तक्रार करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in या लिंकचा वापर करता येईल.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.