Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ओबीसी मोर्चाच्या आयोजकांवरील गुन्हे मागे घ्या – आ. किशोर जोरगेवार

Get real time updates directly on you device, subscribe now.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमूख यांना मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चन्द्रपूर २८ नोव्हेंबर :- २६ नोव्हेंबरला ओबीसी जनगणना समन्वय समीतीच्या वतीने चंद्रपूरात यायक मागण्यांसाठी मोर्चा काढणा-या ओबीसी जनगणना समन्वय समीतीच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र समाजभावना लक्षात घेत हे गून्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी केली असून या मागणीचे पत्र त्यांच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमूख यांना पाठविण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ओबीसी समाजाची जातीनिहार्य जनगनणा करण्यात यावी या प्रमूख मागणीसह इतर मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संविधानदिनी म्हणजेच २६ नोव्हेंबरला ओबीसी जनगणना समन्वय समीतीच्या वतीने चंद्रपूरात भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी समीतीच्या वतीने परवाणगी मागण्यात आली होती. मात्र कोरोनाचे कारण समोर करत पोलिस विभागाच्या वतीने परवाणगी नाकारण्यात आली. त्यामुळे विना परवाणगीच हा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. आता या मोर्चाच्या ८ आयोजकांवर आपत्ती व्यपस्थापन कायद्याअंतर्गत रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हे सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी आ. किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली आहे. ओबीसी समाजाची मागणी रास्त आहे. या मोर्चातील समाजाबांधवांचा लक्षणीय सहभाग दखलपात्र आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मोर्चात ओबीसी समाजासह इतर समाजातील नागरिकाही सहभागी झाले होते. राजकीय नेत्यांसह अनेक सामाजिक संघटनांनी या मोर्चाला आपला पाठिंबा दिला होता. त्यामूळे समाज भावनेचा आदर करत आयोजकांवरील गुन्हे मागे घ्यावेत असे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या पत्रातून आ. जोरगेवार यांनी म्हटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.