Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

2023 पर्यंत लोकसंख्येत भारत टाकणार चीनला मागे

संयुक्त राष्ट्र संघाने दिली माहिती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 15 नोव्हेंबर :- चीन आणि भारत हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत. सध्या जगात चीनची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक आहे. मात्र, आता लवकरच भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्राने याबाबतचा एक अहवाल प्रकाशित केला आहे. वर्षभरात म्हणजे 2023 पर्यंत भारत चीनला लोकसंख्येत मागे टाकणार असल्याचे म्हटले आहे.

जगातील लोकसंख्येने 800 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये भारतचा वाटा 135 कोटींहून अधिक आहे. संयुक्त राष्ट्र संघाने याबाबतची माहिती दिली आहे. मंगळवारी जगाने 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. 48 वर्षानंतर जगाची लोकसंख्या दुप्पट झाली आहे. 1974 मध्ये जगाची लोकसंख्या 400 कोटी इतकी होती. 21 व्या शतकाच्या शेवटपर्यंत जगाची लोकसंख्या 1000 कोटी इतकी होईल, त्यानंतर जगाची लोकसंख्या वेगाने वाढणार नाही, उलट कमी होउ शकते. कारण जगाचा जन्मदर कमी व्हायला लागलेला आहे. त्यानुसार लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी होउ शकते असे संयुक्त राष्ट्राने रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी जगाच्या लोकसंख्येने 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. 2030 पर्यंत ही संख्या 850 कोटी, 2050 पर्यंत 970 कोटी आणि 2100 पर्यंत 1040 कोटीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. 2050 पर्यंत आपले सरासी आर्युमान 77.2 वर्ष इतके राहील असा अंदाज आहे. 2019 मध्ये आपले सरासरी आर्युमान 72.2 वर्ष इतक होते. तर 1990 मध्ये आपले अंदाजे आर्युमान 63 वर्ष इतके होते. त्याशिवाय पुरूषांच्या तुलनेत महिला 5.4 वर्ष जास्त जगतात. महिलांचे सरासरी वय 73.4 आहे तर पुरूषांचे सरासरी वया 68.4 वर्ष इतके आहे असेही रिपोर्टमध्ये सांगितले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.