Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मेडीगड्डा धरणग्रस्तांनी जयंत पाटलांसमोर मांडली कैफियत – प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची केली तक्रार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दी,२६ नोव्हेंबर : गेल्या २० दिवसांपासून साखळी उपोषणाला बसलेल्या मेडीगड्डा धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाने शनिवारी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची गडचिरोली येथे भेट घेऊन आपली कैफियत मांडली. इतक्या दिवसांपासून आम्ही उपोषणाला बसलोय पण प्रशासनाकडून कुणीही आमची विचारपूस करायला आलेला नाही. अशी तक्रार देखील केली.

तेलंगणा सरकारने महाराष्ट्राच्या सीमेवरील सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडीगड्डा धरणामध्ये जमीन गेलेल्या १२ गावातील शेतकऱ्यांना अद्याप मोबदला दिलेला नाही. प्रस्तावित जमिनीपैकी तात्काळ गरज असलेली जमीन थेट खरेदी केली. मात्र, उर्वरित जमिनीचा मोबदला अद्याप दिलेला नाही. त्यामुळे पीडित शेतकरी तीन वर्षांपासून आंदोलन करीत आहे.मागील वीस दिवसांपासून ते साखळी उपोषणाला बसले आहे. मात्र, त्यांच्याकडे शासन, प्रशासनाकडून कुणीही विचारपूस करायला आला नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने शनिवारी शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल अवगत करून दिले. यावेळी आमदार जयंत पाटील आणि आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आपण हा प्रश्न येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.