Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श ब्युरो
मुंबई :
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. फडणवीस यांच्या कार्यालयातील निकटच्या सर्व सहकाऱ्यांची चाचणी negative आली आहे. फडणवीसांनी स्वतः ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं देखील या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.

‘लॉकडाऊन झाल्यापासून मी दररोज काम करत आहे परंतु आता असे दिसते की, मी स्वतः थोडावेळ थांबावे आणि थोडा वेळ स्वतःसाठी घ्यावा अशी देवाची इच्छा आहे!’ त्यामुळे कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे मी काळजी घेत आहे. देवेंद्र फडणवीस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळी औषधे घेत असून आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना चाचणी करण्याची विनंती केली

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देवेंद्र फडणवीस यांनी काहीच दिवसांपूर्वी सोलापूर दौरा केला होता. पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.