Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवल्याने नाशिकमध्ये तणाव..!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नाशिक 13, डिसेंबर :- नाशिक शहरातील जयभवानी रोड परिसरात असलेल्या महानगरपालिका उद्यानात महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबर रोजी बसवलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मध्यरात्री महानगरपालिका प्रशासनाने हटवल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ सर्व आंबेडकर प्रेमी एकत्र आले असून जयभवानी रोड येथे रास्ता रोको करण्यात येत आहे.

उद्यानातून हटवलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जोपर्यंत पुन्हा बसवण्यात येत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा निर्धार संतप्त आंबेडकर प्रेमींनी केला. तर परिसरात आंबेडकर प्रेमी जोरदार घोषणाबाजी देखील करत आहे. नाशिकच्या जयभवानी रोड परिसरात तणाव पूर्ण वातावरणामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नाशिकमधील नाशिकरोड परिसरात असलेल्या जयभवानी रोडवरील मनपा प्रशासनाच्या उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा महापालिका प्रशासनाने मध्यरात्री हटवल्याचा आरोप यावेळी नागरिकांकडून करण्यात आला. यामुळे परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहे. आज या परिसरात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.

आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आहे. आंदोलक महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहे. आंदोलक आक्रमक झाले असतांना मात्र पोलीस प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीने आंदोलक शांत झाले आणि ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा होता. त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा बसवून आंदोलकांनी बुद्ध वंदना घेतली, आंदोलक काहीसे शांत झाल्याचे दृश्य असलं तरी जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात येत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण हे चालूच राहील, असे आंदोलकांनी सांगितले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.