Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बेंबाळ येथे सरपंच तथा उपसरपंच यांनी पदभार स्वीकारला

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुल 11 , जानेवारी :- मुल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अति महत्त्वाचे समजले जाणारे बेंबाळ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे सरपंचासह सात सदस्य निवडून आले होते. एकूण सरपंचासह ११ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन पॅनलचे सरपंचासह सात सदस्य होते. थेट जनतेतून आलेले सरपंच चांगदेव केमेकार यांनी आज सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. उपसरपंचाच्या शर्यतीत देवाची ध्यानबोईवार व राकेश दहीकर यांनी दावेदारी केली होती.

उपसरपंचाच्या निवडीमध्ये परिवर्तन पॅनलच्या सरपंचासह सातही सदस्यांनी एकमताने देवाजी ध्यानबोईवार यांची उपसरपंच म्हणून निवड केली. देवाजी ध्यानबोईवार यांना एकूण आठ मते तर राकेश दहीकर यांना चार मते मिळाली. सरपंच पदाच्या निवड समितीचे अध्यक्ष सरपंच होते तर निरीक्षक अधिकारी तिजारे व ग्राम विकास अधिकारी आकुलवार हे उपस्थित होते. उपसरपंचाची निवड अतिशय शांततेत पार पाडली असून गावकऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी सरपंच व उपसरपंच तसेच इतर निवडून आलेल्या सदस्यांनाही शुभेच्छा दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.