Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात व्यापरवृध्दीला विपुल संधी

उच्चायुक्त यांनी घेतली उप सभापती, डॉ.नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई  09 फेब्रुवारी:- भारत आणि ऑस्ट्रेलियाचे मैत्रीसंबंध दृढ असून दुग्धउत्पादने, आयुर्वेदिक औषधे, पर्यटन विस्तार, मसाले उत्पादने, वायनरीसारखे कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान, उच्च शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये व्यापार कक्षा आणखी वृध्दींगत व्हावी अशी अपेक्षा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती, डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.आज दिनांक 08 फेब्रुवारी, 2023 रोजी विधानभवनातील त्यांच्या दालनात ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बेरी ओ फॅरेल, वाणिज्यदूत पीटर ट्रसवेल, उप वाणिज्यदूत मायकल ब्राऊन यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

महिला सक्षमीकरणासंदर्भात महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती यावेळी उप सभापती, डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली. उच्चायुक्त बेरी ओ फॅरेल यांनी यासंदर्भात ऑस्ट्रेलियातील शासकीय आणि अशासकीय संस्था यांच्या समन्वयातून महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रात भरीव कार्य केले जाऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली. ऑस्ट्रेलियात 10 लाखांपेक्षा अधिक भारतीय वंशाचे रहिवासी आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील भारताचा ऑस्ट्रेलियासोबत होणारा व्यापार आणखी वाढविता येईल. योग विद्या आणि आयुर्वेदिक औषधे यांना जगभराप्रमाणे ऑस्ट्रेलियात देखील मोठी मागणी आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्रात अनेक प्रगतीशील शेतकरी केवळ औषधी गुणधर्म असलेल्या कृषी उत्पादनांची लागवड करतात. त्यामुळे यासंदर्भातील निर्यातीला प्रोत्साहान मिळावे या मुद्यावर उभयपक्षी विस्ताराने चर्चा झाली. विधानसभा सदस्यआदित्य ठाकरे हे पर्यावरण व पर्यटन मंत्री असतांना सागरी किनारा सुरक्षा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला. हा स्तुत्य उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्यात यावा असे मत यावेळी वाणिज्यदूत पीटर ट्रसवेल यांनी नोंदविले. येत्या 08 मार्च, 2023 या जागतिक महिलादिनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात महिलांच्या प्रश्नांसदर्भात विचारमंथन होईल, यासंदर्भात महिला पीठासीन अधिकारी या नात्याने आपण पुढाकार घेतला असल्याची माहिती उप सभापती, डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली. “समानतेकडून विकासाकडे: शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने” ही आपली पुस्तिका यावेळी उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांना भेट दिली. या भेटीप्रसंगी मा.उप सभापती यांचे खाजगी सचिव,रविंद्र खेबुडकर, विशेष कार्य अधिकारी,प्रदीप ठाकरे, डॉ.अर्चना पाटील, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, कौस्तुभ खांडेकर उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.