रेल्वे इंजिनने धडक दिल्याने चार रेल्वे कामगारांचा मृत्यू
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
लासलगाव 13 फेब्रुवारी :- लासलगाव रेल्वे स्थानकावर सकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन (टॉवर) चुकीच्या दिशेने आल्याने काम करत असलेल्या चार गँगमनला उडवल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेत चारही गँगमनचा दुर्दैवी मृत्यू झाला.
लासलगाव रेल्वे स्थानकावर आज (दि. १३) पहाटे 5. 44 वाजेच्या दरम्यान टॉवर लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन लासलगाव बाजूने उगावकडे जात होते. त्याचवेळी पोल नंबर १५ ते १७ मधील ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू होते. हे काम करित असलेल्या चारही ट्रॅक मेंटनर कर्मचाऱ्यांना रेल्वे लाइनच्या मेटेंनेंस कर्मचाऱ्यांना टॉवर इंजिनने धडक दिल्याने य़ा दुर्घटनेत संतोष भाऊराव केदारे (38), दिनेश सहादु दराडे (35), कृष्णा आत्मराम अहिरे (40), संतोष सुखदेव शिरसाठ (38) या चार कामगारांचा मृत्यू झाला आहे.
हे पण वाचा :-


Comments are closed.