Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आमसभेत झाला विधवा प्रथा बंद करण्यांचा ठराव

आमदार डॉ.देवराव होळी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती गडचिरोली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 23 फेब्रुवारी :- पंचायत समिती गडचिरोली द्वारा आयोजित आमसभा आज दि.22 फेब्रुवारी रोजी डॉ.देवराव होळी, आमदार गडचिरोली, यांचे अध्यक्षतेत पार पडली.या सभेला माजी पं.स.सभापती मारोतराव जी ईचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, पं.स.सदस्य नैताम, मडावी, गोहणै व श्रीम मडावी उपस्थित होत्या. यासह अन्य विभाग अधिकारी व पं.स.कार्यालय अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते.

वार्षिक आमसभेत महत्वपुर्ण विकास योजना आढावा तथा ठराव पारीत करण्यांतआले. नळयोजना, शौचालय, रस्ते, नाली, रखडलेली सर्व परियोजना प्रभावाने पूर्ण करण्यांचे निर्देश अध्यक्ष महोदयांनी दिले. सभेची सुरुवात गावा-गावात एकात्मता, सदभावना टिकून राहावी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा या ओळी च्या राष्ट्रवंदनेने करण्यांत आली. त्यासह माजी सभापती ईचोडकर यांनी राज्यगीत सादर केले. सभेचा शेवट राष्ट्रगीताने करण्यांत आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सभेत सरपंच महोदयांनी ग्रामीण समस्या अध्यक्षाकडे मांडत सोडविण्यांचा आग्रह धरला. प्रसंगी प्रश्न मार्गी लावण्याचे प्रशासनाला निर्देश आमदार महोदयांनी दिले. या आमसभेत पुरातन प्रथेचा बिमोड करण्यांसाठीचा प्रस्ताव हेमंत बोरकुटे यांनी मांडला. अस्तित्वात असलेली विधवा प्रथा बिमोड करुन विधवा स्त्रीयांना सामाजिक दर्जा प्राप्त व्हावा असा आग्रह धरला. यावर सभाध्यक्ष यांनी ठराव पारीत करीत सर्व ग्रामपंचायतीने सामाजिक दायित्व ठेवत ग्राससभा ठराव घेऊन महिलांना सन्मानाची वागणूक देण्यांबाबत ठरावाद्वारे निर्देशित केले.
सभेचे आभार उकंडराव राऊत, विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी मानत सभा संपल्याचे घोषित केले.सभा यशश्वीतेसाठी  बेंडके,वि.आ., श्रीमती पातकमवार, सप्रअ, शेडमाके, लांजेवार, कप्रअ, सर्व महिला व पुरुष कर्मचारी वृंद यांनी कशोशिचा प्रयत्न केला.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.