Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धान खरेदी केंद्राचे अहेरी, आलापल्ली येथे आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी केले आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. 2 डिसेंबर :- शेतकऱ्यांचे या खरीप हंगामातील धान मळणीची प्रक्रियेला सुरुवात झाली असून या हंगामाच्या धान खरेदी केंद्राचे बुधवार 2 डिसेंबर रोजी आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी व आलापल्लीत विधिवत धान खरेदी केंद्राचे शुभारंभ केले. आदिवासी विकास महामंडळ, उप-प्रादेशिक कार्यालय अहेरी अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी केंद्राचे उदघाटन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी शासनाने धानाची हमीभाव निश्चित केले असून अ ग्रेड धान १,८८८ रुपये तर साधारण धान १,८६८ रुपये भाव घोषित केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने ७०० रुपये बोनस घोषित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले धान बाहेर विक्री न करता थेट शासकीय गोदामात आणून धानाची विक्री करावी असे आवाहन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

धान खरेदी केंद्राच्या शुभारंभाच्या वेळी आदिवासी विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष क्रिष्किंद्रराव बाबा आत्राम, उपाध्यक्ष बाबुराव जक्कोजवार, विपणन सहाय्यक दामोदर जुगनाके, ग्रेडर अनंतकुमार आलाम, माजी सरपंच गंगाराम कोडापे, सचिव राजेंद्र गौरकार आदी तर आलापल्ली येथे भीमय्या साइनवार, अचूबाई सडमेक, ईश्वर वेलादी, माजी उपसरपंच मलय्या तोटावार, सचिव कोमले, लक्ष्मण येरावार, बाबुराव तोरेम, पुनशे, तलांडे, बशीर शेख, सुरेश कोरेत, बाबुराव जुनघरे, आदित्य जक्कोजवार, शुभम चिंतावार आदी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.