अहेरी जिल्हा कार्यकारिणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे घटित
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी, ,13 मार्च :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम क्षेत्रीय सह संघटन मंत्री रायसिंग जी व विदर्भ प्रांतमंत्री शक्ती केरामजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अहेरी जिल्हा कार्यकारणी घटित करण्यात आली.
आलापल्ली येथे झालेल्या बैठकीत शक्ती केरामजी यांनी अहेरी जिल्हा कार्यकारणीची घोषणा केली यामध्ये नगर अध्यक्ष म्हणून प्रा. राहुलजी द्विवेदी, नगरमंत्री म्हणून रोहित मुक्कावार, सहमंत्री म्हणून तुषार मठ्ठामी, महाविद्यालय प्रमुख म्हणून विनय गुप्ता, सोशल मीडिया प्रमुख म्हणून रोहित श्रीरामवार, एस के डी प्रमुख म्हणून तुषार पुलगमकरआणि विजय चौधरी, जनजाती प्रमुख म्हणून विवेक आत्राम आणि सदस्य म्हणून अभिजीत कत्रोजवार, सुरज मंडल शुभम कोठा, अनिकेत गजबे, शैलेश बोरम, स्नेहा मेश्राम, निकिता गंधरवार हे ठरविण्यात आले आणि यावेळी रायसिंग जी यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला आणि मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हे पण वाचा :-
Comments are closed.