Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोनी हत्याकांडातील सातही आरोपींना आजन्म कारावास.

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील 2014 मध्ये घडलेल्या बहुचर्चित सोनी हत्या कांडाचा आज निकाल लागला

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

भंडारा, 11 एप्रिल :- वाढदिवसाच्या दिवशी धृविल ला न्याय मिळाला असून त्याची आणि त्याच्या आई वडिलांची निर्घृण हत्या करणाऱ्या ७ ही नराधमांना मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश अस्मर यांनी तिहेरी जमठेपेची ( आजीवन कारावास) शिक्षा सुनावली आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील 2014 मध्ये घडलेल्या बहुचर्चित सोनी हत्या कांडाचा आज निकाल लागला आहे. मृतक ध्रुविल याचा आज वाढदिवस आहे, खऱ्या अर्थाने त्याच्या मृत आत्म्याला आज न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी निकालानंतर दिली आहे.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील प्रतिष्ठीत सराफा व्यापारी संजय सोनी त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा ध्रुवील या तिघांचा २६ फेब्रुवारी 2014 मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या घरातून ८.३ किलो सोने, ३४५ ग्रॅम चांदी आणि ३९ लाख रुपये रोख असे साडेतीन कोटींचा ऐवज पळविला होता. त्यानंतर हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सातही आरोपींना २४ तासाच्या आत अटक केली होती. यातील चार आरोपींना तुमसरातून, दोन आरोपींना नागपुरातून आणि एक आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली होती. आरोपींमध्ये शाहनवाज ऊर्फ बाबू शेख, महेश आगाशे, सलीम पठाण, राहुल पडोळे, केसरी ढोले रा.तुमसर, सोहेल शेख , रफीक शेख रा.नागपूर यांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तुमसर पोलिसांनी या प्रकरणात ८०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. पोलिसांना याशिवाय केमिकल आणि डीएनए अहवालासह अन्य अहवाल न्यायालयात सादर करण्यात आले होते.अतिशय थंड डोक्याने षडयंत्र करून हत्या करणाऱ्या या सातही नराधमांना आज जिल्हा सत्र न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणांमध्ये कोणीही प्रत्यक्षदर्शी नसतानाही पोलिसांनी केलेल्या योग्य तपासामुळे आणि त्यांनी दिलेल्या पुराव्यामुळे हत्याकांडातील या सातही आरोपीवर अपराध सिद्ध करणे शक्य झाले असल्याचे उज्वल निकम यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील एकूण ४६ साक्षीदार तपासले आहेत. या प्रकरणातील आरोपी हे 1970 पासून चोरीच्या प्रकरणातील आरोपी आहेत मात्र त्यांना अजून पर्यंत कुठलीही शिक्षा न झाल्यामुळेच एवढा मोठा हत्याकांड घडवून आणल्याचे आम्ही न्यायालयाच्या निर्देशालाच आणून दिले असल्याचे निकम यांनी सांगितले. त्यामुळे या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आम्ही केली मात्र न्यायालयाने त्यांना हत्या, दरोडा, आय पी सी ४४९ कलामा खाली (तिहेरी जन्मठेपेची) आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली असल्याचे त्यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या निकालानंतर कुटुंबीयांनी न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त केला असला तरी आरोपींना फाशी व्हावी अशी अपेक्षा कुटुंबियांची होती मात्र जो निकाल न्यायालयाने दिला त्याचा निकालाची प्रत हातात आल्यानंतर विचार करून पुढील निर्णय घेऊ असं कुटुंबीयांनी सांगितले.सरकारी वकिलांच्या आरोप पत्रात बऱ्याच त्रुटी असून आमच्या लोकांना फसविल्या गेले आहे. आजच्या निकालाची प्रत हातात आल्यानंतर या निकाला विरुद्ध हायकोर्ट मध्ये अपील करू असे आरोपीच्या वकिलांनी सांगितले.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.