Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मूलचेरा तालुक्यातील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांची वनहक्क दावे निकाली काढून कायम पट्टे द्या

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची चामोर्शी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चामोर्शी, 11 एप्रिल :- मूलचेरा तालुक्यातील बंदुकपल्ली व परिसरातील शेतकऱ्यांचे वन हक्क जमीनीचे दावेअनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. अतिक्रमण धारक शेतकऱ्यांकडे अतिक्रमण पंजी नाही, अतिक्रमण पंजीत अतिक्रमणाची नोंद नाही या क्षुल्लक कारणावरूनअनेक शेतकऱ्यांचे वनहक्क दावे प्रलंबित ठेवले. वनहक्क कायद्याच्या 2005 चा अतिक्रमण पुरावा ग्राह्य धरून वनजमिनीवर अतिक्रमण करून त्यातून उदरनिर्वाह करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचे वनहक्क दावे निकाली काढून त्यांना न्याय मिळवून द्यावा,या मागणीसाठी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी शेतकऱ्यांसोबत चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांची भेट घेऊन यावर सविस्तर चर्चा करून त्यांना शेतकऱ्यांच्या बाजूने निवेदन दिले.

माजी आमदार आत्राम हे उपविभागीय अधिकारी तोडसाम यांच्यासोबत चर्चा व निवेदन सादर करतांना मूलचेरा नगर पंचायतचे गटनेत्या व नगरसेविका सुनीताताई कुसनाके,नगरसेवक बंडुजी आलाम,नगरसेवक संतोष चौधरी,संदिप तोरे, देवराव तलांडे,संतोष तोरे,धर्मा आत्राम,अरविंद तोरे,रवी तलांडे,हिरामण दिवटीवार, श्रीराम मडावी,बाजीराव मडावी बुजंगराव मडावी,जुलेख शेख,विनोद कावेरी,सतीश पोरतेट सह आविस व बि.आर.एस चे पदाधिकारी आणि अतिक्रमण धारक शेतकरी बांधव उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.