Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टेकूलगुडा येथील स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करून परवाना रद्द करा : जिल्हाधिकारी कडे निवेदन देवून मागणी.

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात शिष्ठामंडळानी मागणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 14 एप्रिल : अहेरी तालुक्यांतील टेकूलगुडा येथे स्वस्त धान्य दुकान असून  कपिल बंडु तलांडी यांच्या नावाने परवाना असून धान्य दिले जाते.मात्र दिनांक ६/४/२०२३ ला रात्री 8:00 वाजेच्या सुमारास स्वस्त धान्य दूकानातील धान्य १० पोते अवैध्यरित्या नेत असताना गावाबाहेर गावातील नागरिकांनी काळाबाजरीत जाणाऱ्या धान्य पकडले असून तहसील कार्यालयात माहिती देण्यात आली होती,तेंव्हा तहसील कार्यालयातील अधिकारी येवून पंचनामा करून धान्य ताब्यात ठेवण्यात आले असून सदर दुकानदार गेल्या कित्येक वर्षांपासून काळा बाजार करत आहे तसेच स्वस्त धान्य दुकानात दिला जाणारा साखर ४० रू.किलो विकत असून यांबाबत अनेकदा तक्रार करण्यात आले आहे.मात्र संबंधित दुकानदारावर अजून पर्यत करवाई करण्यात आली नाही.त्यामुळे अहेरीचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार साहेबांना यांच्या मार्फतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अहेरी अजय कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन पाठवण्यात आले.

यावेळी निवेदणकर्ते( टेकूलगुडा) जिल्हा परिषद सदस्य कु.सुनीतानामदेव कुसनाके,पैका तलांडे,अश्विन तलांडे,चिंनू नैताम,सुंदराबाई मडावी,कलमसाई ईस्टाम,मुन्नी ईस्टाम,मनोज ईस्टाम,रमेश ईस्टाम,रावजी ईस्टाम,बंडू ईस्टाम,ईश्वर कोरेत,मधुकर ईस्टाम,बापू आत्राम,संजय आत्राम,रवी आत्राम,भुजंगराव पोरतेट, सुमनबाईआलम, गिरमाजी तलांडे,रुपेश तलांडे,सचिन तलांडे इतर (मुत्तापूर) सुखमा सिडाम,गंगुबाई सिडाम,सुनंदा ईस्टाम,विमल वेलादी,मीराबाई सिडाम,सुमनबाई सिडाम,ताराबाई सिडाम,पालुबाई सिडाम,अमृता सिडाम,सुंदरीबाई सिडाम,मीराबाई सिडाम,मंदा सिडाम,यशोदा कोरेत,सुनीता तलांडे,ताराबाई मडावी,आनंदाबाई मडावी,छाया सिडम,भीमा मडावी,पंचपुला मडावी,पोचूबाई सिडम,सुमन मडावी,सगुणाबाई मडावी,आनंदीबाई वेलादी,अनिता वेलादी,सुनीता वेलादी,सुरेखा पोरतेट, वारलु मडावी,सोमा आत्राम,मीराबाई वेलादी,रघु आत्राम,कमल वेलादी,जयवंती मडावी,रावजी मडावी,नारायण सिडम,जयत्री सिडम,तारा मडावी,बक्क सोयाम,मिनाबाई आत्राम,सगुणाबाई मडावी व गावातील सर्व राशन कार्ड दारख उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.