महिलाचा गावातील सहा दारूविक्रेत्यांच्या घरापुढे महिलांनी केला ‘बाजा बजाओ आंदोलन’
मीचगाव खुर्द येथील अवैध दारूविक्री विरोधात ग्रामस्थ एकवटले
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
धानोरा, 20 एप्रिल : धानोरा तालुक्यातील मीचगाव खुर्द येथील अवैध दारूविक्रेत्यांना वारंवार सूचना व नोटीस देऊनही अवैध व्यवसाय सुरूच आहे. परिणामी घरातील कर्ता पुरुष तांदूळ, कोंबड्या विकून दारूचे व्यसन पूर्ण करीत असल्याने अखेर त्रस्त झालेल्या मीचगाव बुज व मीचगाव खुर्द येथील गाव संघटनेच्या महिलांनी दारूविक्रेत्यांच्या घरापुढे ‘बाजा बजाओ आंदोलन’ करून लक्ष वेधले. सोबतच यापुढे अवैध व्यवसाय करणार नाही अशा आशयाच्या शपथपत्रावर सहा विक्रेत्यांची स्वाक्षरी घेतली.
Comments are closed.