Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

12 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 3 डिसेंबर: चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्या स्तरीय न्यायालयांमध्ये दिनांक 12 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेली प्रकरणे, तसेच नवीन प्रकरणे किंवा महत्त्वाची प्रकरणे लोक न्यायालय सारख्या यंत्रणेच्या माध्यमातून त्वरित निकाली काढून त्यांचे निवारण यावेळी करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कोर्टातील खालील प्रकारची 3 हजार 500 हुन अधिक प्रकरणे आपसी समझोत्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यात समझोता योग्य फौजदारी प्रकरणे, अधिकोष वसुली प्रकरणे, मोटार अपघात दावा प्राधिकरणातील प्रकरणे, अपघात माहिती अहवाल व कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणे, श्रमिकांचे वाद व त्यांच्या पुनर्नियुक्तीमधील जुन्या वेतनासंबंधीची प्रकरणे(कामगारांसंबंधी निस्तारणासंबंधीचे दावे, पॉलिसी, औद्योगिक कामगारांच्या वेतनासंबंधीचे आणि इतर प्रलंबित फायद्याची प्रकरणे), भू-संपादन प्रकरणे, विजेची आणि पाणी बिलाची (चोरीची) प्रकरणे, नोकरी संबंधी प्रकरणे ज्यामधील पैसे आणि भत्ते आणि सेवानिवृत्तीनंतरच्या फायद्यासंबंधी प्रकरणे, महसूल प्रकरणे, दिवाणी दावे-भाडेसंबंधी, वहीवाटसंबंधीचे दावे आणि दूरध्वनी प्रकरणे आदींचा समावेश राहणार आहे.
सदर लोकअदालतमध्ये तडजोड व समझोतानामा नोंदविण्यासाठी पक्षकारांची ओळख पडताळुन व्हॉटस्ॲप कॉलींग तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे कार्यवाही करण्यास मान्यता मिळाली आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर, येथे अथवा हेल्पालाईन क्रमांक 07172-271679 यावर संपर्क करावा.
या राष्ट्रीय लोक अदालत संधीचा सर्व संबंधित पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा न्या. कविता बि. अग्रवाल यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.