Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाच्या समितीची क्लीनचिट!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

हिंडनबर्ग केस, 19 मे – अदानी समुहाच्या शेअर्सच्या किमतीत गडबड झाल्याचे तूर्त तरी दिसत नाही. The Securities and Exchange Board of India (SEBI) ने दिलेली माहिती व तपशीलाच्या आधारे अदानी समुहाने SEBI च्या नियमांचा भंग केल्याचाही निष्कर्ष काढता येणार नाही, असा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने दिला आहे. हा अहवाल म्हणजे अदानी समुहाला क्लिन चिट मिळाल्याची चर्चा आहे.

हिंडेनबर्गने आरोप केल्यानंतर २४ जानेवारी २०२३ रोजी अदानी समुहामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. त्यामुळे या काळात भारतीय शेअर बाजार अस्थिर झाला नसल्याचे स्पष्ट होते, असेही तज्ज्ञ चौकशी समितीने अहवालात म्हटले आहे. SEBI ने १३ व्यवहारांचा तपशील दिला आहे. हा तपशील अदानी समुहाशी संबंधीत आहे. या व्यवहारात अदानी समुहाने SEBI च्या नियमांचा भंग केल्याचे तूर्त तरी दिसत नाही. चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक नाही. कृत्रिमरित्या गुंतवणूक झाली नाही, असेही स्पष्ट होत नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हिंडेनबर्नग आरोप करण्याआधी काही व्यवहार अल्प कालावधीसाठी झाले होते. अदानीचे शेअर्स पडल्यानंतर या व्यवहारांचा नफा कमी झाला. शेअर बाजारात अदानी समुहाचे शेअर्स पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात आले. हिंडेनबर्गनेच्या आरोपाआधी अदानीच्या शेअर्सला जी किंमत होती ती पुन्हा देण्यात आली नाही. नव्याने शेअर्सचा किंमत देण्यात आली, असेही तज्ज्ञ समितीने अहवालात नमूद केले आहे.

Comments are closed.