Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

30 युवक-युवतींना रोजगारासाठी नियुक्ती पत्र वितरीत

सिपेट येथे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 5 –  चंद्रपूर येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट) ही भारत सरकारच्या रसायन व पेट्रोरसायन विभाग तसेच रसायन व खते मंत्रालयाची मान्यताप्राप्त असलेली ISO 9001:2015 प्रमाणित नामांकित इन्स्टिट्यूट आहे. प्लास्टिक आणि संबंधित उद्योगांच्या क्षेत्रातील मानव संसाधन व कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी आणि या क्षेत्रातील उद्योगांना तांत्रिक सहाय्य सेवा प्रदान करण्यासाठी या संस्थेमध्ये तीन व सहा महिने कालावधीचे रोजगरभिमुख कौशल्य विकास कार्यक्रम राबविले जातात. यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याना नामांकित प्लास्टिक उद्योग कंपन्यांमध्ये रोजगार दिला जातो.

अशाच प्रकारचा तीन महीने कालावधीचा कौशल्य विकास कार्यक्रम बिरला ग्रुप, मुकूटबन यांच्या सीएसआर निधी मधून बेरोजगार युवक – युवती करता राबविण्यात आला व त्यातून ग्रामीण भागातील 30 विद्यार्थ्याना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व जॉब ऑफर लेटर वितरित करण्यात आले. याप्रसंगी आरसीसीपीएल कंपनीचे प्रमुख अभिजीत दत्ता, नवीन काकडे, व्यवस्थापक आर्णवकुमार घोष तसेच सिपेट चंद्रपूरचे संचालक व प्रमुख ए. के जोशी, प्राशासनिक अधिकारी मनोजकुमार दान, प्लेसमेंट अधिकारी पुष्कर देशमुख, नागपूर येथील नित्यानंद उद्योग ग्रुपचे मनीष श्रीवास्तव प्रामुख्याने उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या वेळी प्रशिक्षणात सहभागी वैभव भोयर, सूरज कुडमेथे, आदित्य गोहुकर, आचल आत्राम, मेघा बडणार आदी विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त करताना आरसीसीपीएल व सिपेट संस्थेचे आभार व्यक्त केले. माजी विद्यार्थिनी प्रतीक्षा देवगडे हिने स्वतःच्या नोकरीचा अनुभव सांगत बेरोजगार युवक – युवतींना या प्रशिक्षणाचे महत्व पटवून दिले. अभिजीत दत्ता यांनी सीएसआर निधी चांगल्या सामाजिक कामासाठी उपयोगी पडल्याचे व 30 विद्यार्थ्याना चांगला रोजगार प्राप्त होऊन ते स्वतःच्या पायावर उभे राहिले म्हणून समाधान व्यक्त केले. तसेच येत्या काळात अधिकाधिक बेरोजगार युवक-युवतींकरीता सिपेटच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबवू, अशी ग्वाही दिली.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.