Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, 9 जून- बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र ही संस्था बांबू क्षेत्रात प्रशिक्षण व तांत्रिक ज्ञान देणारी वनविभागाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमार्फत अभ्यासक्रम संचालित केला जातो. एम.एस.बी.टी.ई. शी संलग्नित असणारा दीड वर्षीय पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा अभ्यासक्रम म्हणून परिचित आहे.

दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय? याबाबत अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरविषयी चिंता असते. औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. शिक्षणातून रोजगार मिळावा या उद्देशाने अनेक विद्यार्थ्यांचा ओढा औद्योगिक, व्यवसायिक अभ्यासक्रमाकडे दिसून येतो. उद्योगशील क्षेत्रापैकी झपाट्याने विस्तार होणारे क्षेत्र म्हणजे बांबू क्षेत्र होय. या क्षेत्रातील कुशल व तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेता शासनाने बांबू तंत्रज्ञान पदविका (डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी) अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 20 विद्यार्थी मर्यादित असून कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सदर अभ्यासक्रम प्रवेश घेता येईल. वस्तीगृहाची मोफत सुविधा, बांबू क्षेत्रातील संपूर्ण तांत्रिक ज्ञान, शिक्षणातून रोजगार अशी वैशिष्ट्ये असलेल्या या पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण भारतात विविध प्रख्यात बांबू संस्थेत अभ्यासक्रम दौरा आयोजित करून विद्यार्थ्यांमधील उद्योजकता व तांत्रिक कौशल्य विकसित केले जातात. सन 2017 पासून सुरू असलेल्या या अभ्यासक्रमाचे उत्तीर्ण विद्यार्थी बांबूच्या विविध क्षेत्रात उद्योजक म्हणून तसेच स्वयंरोजगार प्राप्त करून प्रभावीपणे कार्यरत आहे. तरी जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या पदविका अभ्यासक्रम प्रवेश निश्चित करण्यासाठी तसेच अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9552729996 व 9422733747 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राचे संचालक यांनी केले आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.