Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दारूबंदीचा निर्णय घेऊन विक्रेत्यांना दिले नोटीस

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 17 जून – चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे मुक्तिपथ व संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सघन बैठकीत दारू बंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सोबतच दारूविक्रेत्यांना नोटीस बजावून यापुढे कोणी मुजोरीने दारू विक्री केल्यास, त्याच्यावर कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.

अनखोडा या गावात गाव संघटनेच्या महिलांनी अनेक बैठका व दारू विक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती करून कृती करून पाच वर्षांपूर्वी गावाला दारूमुक्त केले होते. मात्र, मागील काही वर्षांपासून १० विक्रेत्यांनी दारूविक्रीचा अवैध व्यवसाय सुरु केला आहे. दारूमुळे गावाचे होणारे नुकसान लक्षात घेता, सघन बैठकीच्या माध्यमातून महिलांनी पुन्हा दारूबंदीचा ठराव पारित केला. सोबतच दारू विक्रेत्यांना दारूबंदी बाबत सूचना सुद्धा दिले आहे. यावेळी दारूबंदीमुळे गावाचा फायदा काय ? याबाबत मुक्तिपथ  तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांनी योग्य मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच रेखा येलमुले, ललिता घ्यार, विठाबाई घ्यार, शीतल नागापूरे, पुष्पा सहारे, वच्छला पोरेटे, उषा पाल, मनीषा पाल, बेबी कुरवटकर, विठाबाई ढवसक, सुमन चहारे, पंचफुला घ्यार, वर्षा घ्यार, माया घ्यार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-  

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.