Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

झरपट नदी व शहरातील नाल्यांची सफाई तातडीने करा

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मनपा आयुक्तांना निर्देश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, 21 जुलै – अतिवृष्टीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चंद्रपूर शहरातील झरपट नदी आणि शहरा लगत असलेले मोठे नाले तसेच नाल्यांची साफसफाई तातडीने करा, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले.

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा जिल्ह्याला मोठा फटका बसला. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले तर अनेक घरांचे नुकसानही झाले. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना दिल्या. तसेच पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाचे पूर्ण नियोजन करा, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते. याच धरतीवर चंद्रपूर शहरातील नियोजनाच्या दृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘चंद्रपूर शहरात १८ जुलैला २४० मिली पाऊस पडला. त्यामुळे शहर जलमय झाले होते. शहरात जागोजागी पाणी साचल्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आणि वाहतुकीचा खोळंबा झाला. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरांचे नुकसान झाले. घरातील साहित्य वाहून गेले. अशी समस्या पुन्हा निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे,’ असे  सुधीर मुनगंटीवार यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

‘झरपट नदी व शहारा लगत असलेले नाले तसेच अंतर्गत नाल्यांची साफसफाई व दुरुस्ती करण्यासाठी तातडीने मोहीम राबवावी व अंमलबजावणीचा अहवाल सादर करा,’ असे आदेशही जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.