Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘वन नेशन वन प्रॉडक्ट’ अंतर्गत चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर सोवनियर शॉपचे उद्घाटन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

चंद्रपूर, 17 ऑगस्ट 2023 : स्थानिक उत्पादित मालाला देशपातळीवर व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजना साकारण्यात आली. या अंतर्गत बांबू कारागीर आणि स्वयंसहायता गटामधील महिलांच्या बांबू हस्तकलेला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि रेल्वे स्टेशन, चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने चंद्रपूर रेल्वे स्टेशन येथे सोवनियर शॉपचे (बांबुच्या शोभिवंत वस्तुचे दुकान) उद्घाटन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीचे संचालक एम. एस. रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले.

चंद्रपूर आणि गडचिरोली येथे बांबू आणि त्यावर आधारीत हस्तकलेला विशेष महत्त्व असून या क्षेत्राशी असंख्य बांबू कारागीर आणि स्वयंसहायता गटामधील महिला जुळून आहेत.  या सोवनियर शॉपच्या माध्यमातून त्यांच्या हस्तकलेस व्यासपीठ मिळाले आहे. याबाबत कार्यक्रमस्थळी उपस्थित महिलांनी आनंद व्यक्त करून तिनही विभागाचे आभार मानले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी बांबू केंद्राचे संचालक अविनाश कुमार, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी काठोळे, रेल्वे स्टेशन मॅनेजर देवगडे, कमर्शियल निरीक्षक मिश्रा, चंदेलकर, खुशिया लोकसंचालित समूह महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनिता गनफाडे तसेच तिनही विभागाचे अधिकारी, कर्मचारी,  बचत गटाच्या महिला, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.