Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महाविजय-२४ अभियानाचा शुभारंभ

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 23 ऑगस्ट : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत आज गडचिरोली येथे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या बूथ, शक्तीप्रमुख तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ‘संपर्क से समर्थन’ अर्थात महाविजय-२०२४ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर बावनकुळे यांनी त्रिमूर्ती चौकापासून रा.स्व.संघाचे जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा यांच्या घरापर्यंत पायी चालत व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला. यानंतर सुमानंद सभागृहात महाविजय-२४ अभियानाला बावनकुळे यांनी संबोधित केले. त्यांनी केंद्र सरकार राबवीत असलेल्या योजनांच्या माहितीची पुस्तके वितरीत केली. शिवाय अभियानाची संपूर्ण माहितीही उपस्थितांना दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यानंतर खा.अशोक नेते यांच्या निवासस्थानी बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकारने नऊ वर्षांत लोकोपयोगी योजना राबविल्या असून, देशाला सर्वोत्तम राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. घेतलेले कर्ज विकासाची कामे करुन फेडायचे भाजपचे संस्कार आहेत. विकासाची माहिती आम्ही लोकसभा क्षेत्रातील साडेतील लाख मतदारांपर्यंत पोहचवू. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात भाजपने शंभर वॉरियर्स तयार केले असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात ५१ टक्के मतदानासह आम्ही लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुका जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोबतच एनडीएचे ११ घटक पक्ष असल्याने नक्कीच फायदा होईल. देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारले आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्याचा विकास होत असल्याचेही बावनकुळे म्हणाले. याप्रसंगी खासदार अशोक नेते, माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

हे पण वाचा :-

Comments are closed.