Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासी आश्रम शाळेतील 41 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील येरली येथिल घटना.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

भंडारा, 25 ऑगस्ट :  भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुमसर तालुक्यातील येरली येथिल आदिवासी आश्रम शाळेतील 41 विद्यार्थ्याना विषबाधा झाली आहे. या गुरुवारी दुपारच्या जेवणात नंतर काही वेळाने विद्यार्थ्यांचा पोटात दुखू लागले त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.  41 पैकी 23 विद्यार्थ्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णांमध्ये उपचारासाठी भरती केले असून 18 विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालय तुमचं येथे उपचार सुरू आहे उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

भंडारा जिल्ह्यात तुमसर तालूक्यात येरलीच्या आदीवासी आश्रम शाळेत इयत्ता बारावी  पर्यंतचे शिक्षण देण्यात येत असून ही आदिवासी आश्रम शाळा गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालवली जाते. या आश्रमशाळेत 325 विद्यार्थी शिकतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दररोज प्रमाणे गुरुवारी दुपारी विद्यार्थ्यांना जेवण दिले त्यात बटाटा, वाटाणा, चपाती, वरण, भात दिले. विद्यार्थ्यांनी जेवण केल्यावर मुलांना पोट दुखी उलटी आणि मळमळ यांचा त्रास सुरू झाला. याची तक्रार विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांकडे केली. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. हळूहळू ही संख्या झपाट्याने वाढत गेली सुरुवातीला स्थानिक डॉक्टर ला उपचारासाठी बोलविण्यात आले. मात्र ही संख्या झपाट्याने वाढत राहिल्याने सायंकाळी साडेसहा नंतर या विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय भंडारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. हळूहळू ही संख्या 41 पर्यंत पोहोचली असून उपचारानंतर हे सर्व विद्यार्थी आता स्थिर आहेत.

विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी रुग्णालयात जावून डॉक्टरांकडून माहिती घेत विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.