Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अतिदुर्गम भागातील विद्याथ्र्यांसाठी पावसाळी शिबीर संपन्न.

पावसाळी शिबीरामधुन विद्याथ्र्यांच्या कलागुणांना वाव – नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

 गडचिरोली, 10 सप्टेंबर : गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल जिल्हा असून दुर्गम-अतिदुर्गम भागात शिकणा­या विद्याथ्र्यांचा शैक्षणिक, बौद्धीक विकास व्हावा, त्याच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांना मनोरंजनात्मक बाबींचा आनंद घेता यावा या उद्देशाने,  गडचिरोली जिल्ह्रातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येत असलेल्या विविध आश्रम शाळेतील विद्याथ्र्यांंकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने तिस-या पावसाळी शिबीराचे आयोजन दि. 05/09/2023 ते 10/09/2023 या कालावधीत करण्यात आले होते व आज दिनांक 10/09/2023 रोजी त्याचा समारोपीय कार्यक्रम पोलीस मुख्यालय, गडचिरोली याठिकाणी पार पडला.

आज झालेल्या समारोपीय कार्यक्रमामध्ये पावसाळी शिबीराकरीता सहभाग घेतलेले 86 विद्यार्थी तसेच त्यांचेसोबत कवायत निर्देशक, योगा शिक्षक उपस्थित होते. शिबीरातील विदयाथ्र्यांना संबोधीत करतांना मा. पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले की, आपण आपले ध्येय उच्च ठेवावे व ते गाठण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करुन आपल्या आई-वडीलांचे नाव आपल्यामुळे समाजात मोठे होईल यासाठी प्रयत्न करावे, अशा प्रकारे त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या आयोजित केलेल्या तिस-या पावसाळी शिबीरादरम्यान सहभागी विद्याथ्र्यांनी योगा, ट्रॅकिंग, स्विमींग, खेळाचा आनंद घेतला तसेच व्यक्तीमत्व विकासाचे प्रशिक्षण घेऊन चंद्रपूर जिल्ह्रातील वीसापूर येथील सैनिकी विद्यालय बॉटनिकल गार्डन, लाकडी डेपो, भद्रावती येथील विजासन टेकडी, ताडोबा जंगल सफारी, बटरफ्लाय गार्डन, तसेच त्यानंतर नागपूर येथील दीक्षाभूमी, रमन विज्ञान केंद्र व इतर विविध ठिकाणांना भेटी दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली पोलीस दल व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांच्या माध्यमातून एकुण 05 टप्यांमध्ये 400 विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी सदरचे शिबीर आयोजीत करण्यात आलेले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळी शिबीराकरीता 86 विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला होता. या पावसाळी शिबीराकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख, तसेच प्रकल्प अधिकारी, गडचिरोली  प्रफुल पोरेड्डीवार, सहायक प्रकल्प अधिकारी, गडचिरोली सुधाकार गौरकार यांनी विदयाथ्र्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता उपविभागातील सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.