Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठातील रासेयो कार्यक्रम अधीकारी व स्वयंसेविका यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

एकाच वेळेस दोन पुरस्कार पटकावणारे गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्रातले पाहिले विद्यापीठ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,

गडचिरोली, 26 सप्टेंबर : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नीत असलेले केवळरामजी हरडे महाविद्यालय, चामोर्शी येथील रासेयो कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक डॉ. पवन नाईक व याच महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेविका
जानव्ही पेद्दीवार यांना सन २०२१-२२ चा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय , राष्ट्रीय सेवा योजना विभाग भारत सरकार व्दारा राष्ट्रीय सेवा योजनेतील उत्कृष्ठ काम करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार व उत्कृष्ठ स्वंसेविका पुरस्कार नुकताच गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अंतर्गत असलेले कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन नाईक यांची निवड झाली तर राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ठ रासेयो स्वयंसेवीका म्हणुन सुध्दा गोंडवाना विद्यापीठातिल राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत असलेली स्वयंसेविका जानव्ही विजय पेदीवार हीची निवड झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथम एकाच वेळी रासेयोचे दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे पहले विद्यापीठ म्हणुन गोंडवाना विद्यापीठाला मान मीळाला. डॉ. पवन नाईक व जानव्ही पेद्दीवार यांच्या राष्ट्रीय स्तरावरील निवडीमुळे गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संपुर्ण महाराष्ट्रात अभिनंदन होत आहे.

महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रपती भवनामध्ये २९ तारखेला या दोघांचाही सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे. समाजाप्रती करण्यात आलेले या दोघांचेही कार्य संपूर्ण गडचिरोली जिल्हातच नाही तर महाराष्ट्रात देखील यांनी आपल्या कार्याची छाप सोडलेली आहे. आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधीच घडले नाही आहे की एकाच विद्यापीठातील रासेयो कार्यक्रम अधिकारी आणि रासेयो स्वयंसेविका यांना राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाला असेल जे या वेळेस घडून आलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पुरस्काराकरिता एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन रासेयो स्वयंसेवक यांची निवड करण्यात आलेली आहे. दुसरा स्वयंसेवक हा औरंगाबाद येथील महाविद्यालयातील आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे , प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे , कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी सुध्दा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन नाईक व रासेयो स्वयंसेवीका जानव्ही पेद्दीवार व रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.