Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात स्वच्छता हीच सेवा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी,1 ऑक्टोंबर : स्थानिक अहेरी येथील राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान अहेरीत , प्राचार्य डॉ.एम के मंडळ यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात आला. 1ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता डॉ.एम के मंडळ यांनी महात्मा गांधी व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस मालार पण द्वीप प्रज्वलन करून प्रत्येक नागरिकांनी स्वच्छतेचे नियम पाळायला पाहिजे स्वच्छता ही सेवा या अभियानाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे असे मार्गदर्शन केले.

स्थानिक अहेरी येथील वस्तीत व मुख्य मार्गाने स्वयंसेवकांनी व महाविद्यालयीन सर्व कर्मचारी वृंद, नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी वर्ग, गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, नगरपंचायत सदस्य गण, उपस्थित राहून व स्वतः रस्त्याने झाडू ने साप करीत स्वच्छ अभियान यशस्वी केले. कार्यक्रमाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.तानाजी मोरे यांनी शिस्तबद्ध केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अतुल खोब्रागडे, प्रा. अनिकेत गोंडे , प्रा. कुणाल वनकर प्रा. राठोड प्रा. डॉ. सुनंदा पाल प्रा.कांचन धुर्वे ,प्रा. रमेश हलामी , प्रा. मदन शिरभाये प्रा. सरमुकदम प्रा. सुनील खंडाळे, शशिकांत गावंडे, सुधाकर खरकाटे, राजेंद्र हडपे, अरुण घाटे यांनी अथक परिश्रम घेतले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.