Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल जिल्हाधिका-यांचे कौतुक

प्रधान सचिवांनी पाठविले पत्र

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

चंद्रपूर, 1 नोव्हेंबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमाने करण्यात आला. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गाव, तालुका, शहर आणि जिल्ह्यातून अमृत कलश यात्रा काढण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातही जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हा प्रशासन व लोकसहभागातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या उपक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे कौतुक केले आहे. याबाबतचे पत्र नुकतेच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

27 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत अमृत कलश यात्रेचा राज्यस्तरीय समारोपीय कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये पार पडला. राज्यभरातून 900 स्वयंसेवक 414 कलश घेऊन ऑगस्ट क्रांती मैदान येथे दाखल झाले होते. यात चंद्रपूर जिल्ह्यातील स्वयंसेवकांचा सुध्दा समावेश होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 9 ऑगस्ट 2023 पासून ‘मेरी माटी मेरा देश’ (माझी माती माझा देश) या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या माध्यमातून गावपातळीपर्यंत हा उपक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यात गावागावात शिलाफलकम तयार करून त्यात विरांची नावे लिहिणे व त्यांना नमन, वसुधा वंदन अंतर्गत वृक्षारोपण,अमृत कलश, पंचप्रण शपथेतून देशाच्या विकासात योगदान देण्याचा संकल्प आदी बाबी करण्यात आल्या.

चंद्रपूर येथे 23 ऑगस्ट 2023 रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाचा समारोपीय कार्यक्रम डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम उद्यान, बल्लारपूर रोड, चंद्रपूर येथे करण्यात आला. तर याच दिवशी सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि महानगर पालिकेच्यावतीने ‘साद सह्याद्रीची…भुमी महाराष्ट्राची’ या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.